---Advertisement---

परदेशी नागरिकांसाठी व्हिसाचे नियम आणखी शिथिल,केंद्राचा निर्णय

Follow Us:
---Advertisement---

 

दिल्ली,दि.२२ : भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी व्हिसाचे नियम आणखी शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.या निर्णयानंतर विमान आणि जलमार्गाने येणाऱ्या परदेशी नागरिकांना अधिकृत विमानतळावरच्या आणि बंधारामधल्या तपास केंद्रांवरून भारतात प्रवेश दिला जाईल,असे सांगण्यात आले आहे.तसेच या अंतर्गत भारतात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांना covid-19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे मात्र बंधनकारक करण्यात आला आहे.वंदे भारत अभियान, वायू परिवहन करार तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाच्या परवानगीने येणाऱ्यासाठी हा निर्णय लागू असेल,असे देखील केंद्र सरकारने या निर्णयात म्हटले आहे.या नव्या निर्णयाचे परदेशी नागरिकांनी स्वागत केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!