---Advertisement---

राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र ?

On: September 26, 2020 10:05 PM
Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई,दि.२६ : राज्याच्या राजकारणात आज एक महत्वपूर्ण घटना घडली आहे.ती म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे.

राज्यात सत्ता बदलानंतर पहिल्यांदाच अशी भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही भेट झाल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.या मुलाखतीसाठी त्यांचे एकदा भेटण्याचे देखील ठरले होते. त्यानुसारच ही भेट झाली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान याबाबतीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊत आणि फडणवीस यांच्या एका भेटीत युतीचं काही गणित ठरत नसते. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठक होण्याची गरजेचे आहे. सध्या तरी वातावरण तसे काही नाही, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. मात्र राज्यात शिवसेना आणि भाजप एकमेकापासून दूर गेल्यानंतर अचानक अशी भेट झाल्याने राज्यात चर्चेचे वादळ उठले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!