दिल्ली,दि.२५ : केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना राज्य आपत्ती निवारण निधीतील 50 टक्के रक्कम खर्च करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे पत्र मुख्य सचिवांना पाठवून सविस्तर असे निर्देश दिले आहेत. या निधीतून व्हेंटिलेटर ,प्रयोगशाळा उभे करणे आदी कामे करता येणार आहेत. त्याशिवाय आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका आणि प्रतिबंधित क्षेत्र उभारण्यासाठी च्या खर्चाचाही यामध्ये समावेश आहे, असे देखील या आदेशात म्हटले आहे.