मुंबई, दि.८ : राज्य सरकारने आज तीन आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
यात जी श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातुर यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बियाणे महामंडळ, अकोला येथे करण्यात आली आहे. पृथ्वीराज बी पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी यांची बदली जिल्हाधिकारी लातूर येथे करण्यात आली आहे. तर एस टी टाकसाळे, अतिरिक्त विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी या पदावर करण्यात आली आहे.