---Advertisement---

अक्कलकोटमध्ये कृषी विरोधी कायद्याची होळी ; भारत बंदला अक्कलकोटमध्ये चांगला प्रतिसाद

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट दि,८ : विविध शेतकरी संघटनांनी देशभरात
कृषी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला अक्कलकोटमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.या
आंदोलनात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,वंचित आणि शेतकरी संघटनानी सहभाग घेतला.यावेळी शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या प्रतीची होळी करून केंद्र सरकार विरोधी घोषणाबाजी करीत अक्कलकोट शहराच्या
मुख्य मार्गावरून मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचा समारोप अक्कलकोट येथील बसस्थानक समोर करण्यात आला.केंद्र सरकारच्या कृषी विरोधी कायद्याची पोल-खोल करीत एमएसपी कायद्यात समाविष्ट करून शेतकऱ्यांना बाजार समितीचे संरक्षण मिळण्याची मागणी करण्यात आली.काँग्रेस नेते मल्लिकार्जुन पाटील,वंचितचे चंद्रशेखर मडीखांबे,विरोधी
पक्षनेते अशपाक बलोरगी,स्वामींनाथ हरवाळकर यांनी जाचक कृषी कायदा रद्द करण्याची मागणी केली.
निवेदनाच्या प्रती नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांना देण्यात आल्या.यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष भिमा कापसे,मुबारक कोरबू,बाबासाहेब पाटील,सद्दाम शेरीकर,अविराज सिद्धे,अरुण जाधव,स्वामींनाथ पोतदार,धर्मा गुंजले,सुनील खवळे, चंदन अडवितोटे,रामू समाणे,विकास मोरे,सरफराज शेख, शाबाज एळसंगी,जोतिबा पारखे,शिलामणी बनसोडे,सिद्धाराम जाधव,जोतिबा पारखे, श्रीशैल अल्लोली,मोहसीन बागवान,गणेश कांबळे, सोएल शेख,बाळा वाघमोडे,आलीबाशा अत्तार,अस्लम बागवान, जगदीश माळी, यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सर्व एस टी बसेस बंद होत्या.अक्कलकोटमधील बाजार पेठ,हॉटेल,बाजार समिती,सर्व दुकाने अकरा ते दोन या वेळेत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.या आंदोलनाला चांगला
प्रतिसाद मिळाला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!