ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लस आली म्हणजे कोरोना संपला असे नव्हे !

अक्कलकोट  : कोरोनाची लस रुग्णालयात दाखल झाली असताना अक्कलकोट तालुक्याची वाटचाल मात्र कोरोना मुक्तीकडे सुरू आहे.पहिला रुग्ण तालुक्यात आढळल्यापासून ते आत्तापर्यंत ५ हजार ५११  जणांची आरटीपीसीआर तर २६ हजार २८१ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे यांनी दिली.सध्या केवळ अकरा जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आणि कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९६ टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. रोज किमान दीडशे ते दोनशे जणांची अद्यापही तपासणी सुरू आहे.

ग्रामीणमध्ये आतापर्यंत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे तर शहरांमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे एकूण मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा ७४ आहे. सध्या होम आयसोलेशनमध्ये नऊ तर हॉस्पिटलमध्ये दोन जण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ग्रामीणमध्ये ९१२ रूग्ण आढळले असून ८५४ कोरोनामुक्त झाले आहेत.अक्कलकोट शहरामध्ये ३५९ रुग्ण आढळले असून त्यात ३३२ जण बरे झाले आहेत.तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा हा १ हजार २७१ आहे तर बरे झालेल्यांचा आकडा हा १ हजार १८६ आहे.

मध्यंतरी कोमोरबीड म्हणजे इतर असलेल्यांचा सर्वे झाला होता त्यामध्ये ग्रामीणमधील आकडेवारी समोर आली असून तो आकडा ५२ हजार तीनशे आहे.दरम्यान ही सगळी एकीकडे स्थिती असताना फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना सध्या कोरोना लस देण्याचे काम सुरू असून आतापर्यंत २५६ जणांना ही लस देण्यात आली आहे.६४० डोस प्राप्त झाले असून

ही लस एकूण अकराशे कर्मचाऱ्यांना 

दिली जाणार आहे. यात अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.तपासण्या तर रोज सुरू आहेत ज्यांना अजूनही कोरोनासदृश्य लक्षणे आहेत तातडीने तपासणी करून योग्य ते उपचार घ्यावेत आणि आरोग्याची काळजी घ्यावी,असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

लस आली म्हणजे कोरोना  संपला असे नव्हे

लस आली म्हणजे कोरोना संपला असे नव्हे.त्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे,मास्कचा वापर करणे,स्वच्छतापाळणे ह्या महत्वाच्या गोष्टी आहे.यासाठी आरोग्य विभाग तर प्रयत्न करतच आहे पण न घाबरता लोकांनी देखील समोर येणे गरजेचे आहे.

डॉ.अश्विन करजखेडे,तालुका

वैद्यकीय अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!