---Advertisement---

तोरणमाळ घाटात जीप दरीत कोसळून सहा मजुरांचा मृत्यू

On: January 23, 2021 5:01 PM
Follow Us:
---Advertisement---

नंदुरबार : तोरणमाळ घाटात जीप दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धडगाव तालुक्यातील सातपुड्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ घाटातील खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप ७० फूट खोल दरीत कोसळली आहे. यात ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जीपमध्ये ३१ जण असल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्र -मध्यप्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातील खडकी गावातून तोरणमाळ येथे कामाला जात असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, मजुर घेऊन जाणारी जीप ७०-८० फूट खोल दरीत कोसळल्याने मजुरांचे प्रेत झाडात दगडावर जोरदार आदळल्याने मृत्यू झाला. यात लहान मुलीचा देखील समावेश आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!