रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा अखेर लिलाव झाला आहे. स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून ही जमीन खरेदी केली असून ती तब्बल १ कोटी १० लाख इतक्या किमतीला विकत घेतली आहे. सेफमे यांनी हा ऑनलाईन लिलाव मुंबईत आयोजित केला असून, रवींद्र काते यांनी तो जिंकला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी लोटे इथल्या जागेची किंमत 1 कोटी 9 लाखांच्या घरात निश्चित करण्यात आली होती. स्लगलिंग आणि फॉरेन एक्सचेंज मँनिप्युलेट आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या जागेची पाहणी केली होती. 10 नोव्हेंबरच्या लिलाव प्रक्रियेत दाऊदच्या सात पैकी सहा जागांचा लिलाव झाला होता.
लोटेतील मालमत्तेचा लिलाव मागे घेण्यात आला होता. मागे घेण्यात आलेल्या जागेचा लिलाव 1 डिसेंबर रोजी झाला आहे. याआधी दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या ११ लाख २० हजार रुपयांना विकण्यात आली होती.