---Advertisement---

वाळूच्या टिपरखाली सापडून मोटारसायकलवरील दोन तरुणांचा मृत्यू ; एक गंभीर

On: November 30, 2020 4:47 PM
Follow Us:
---Advertisement---

वेळापूर (सोलापूर) : वेळापूरच्या पूर्वेला उघडेवाडी – धानोरे रोड क्रॉसिंगवर एक भीषण अपघात झाला. टिपरखाली येऊन मोटारसायकलवरील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

तुषार शहाजी जाधव (वय 18) व देवा बाबासाहेब माने (वय 28) असे अपघातातील मृत्यू झालेल्या तरुणांचे नावे आहेत. तर तिसरा तरुण धनंजय संजय माने (वय 17) गंभीररीत्या जखमी असून, अकलूज येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पालखी मार्गाच्या कामावरील एस. एम. आवताडे कन्स्ट्रक्‍शन अँड कंपनीच्या टिपर (एमएच 13 सीयू 9884) खाली मोटार सायकल जाऊन घुसली.  या अपघातात तुषार हा जागेवरच मरण पावला तर देवा माने याला रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला.   अपघात इतका भीषण होता, की मृत तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे घटनास्थळी इतस्ततः विखुरले होते. प्रत्यक्षदर्शी नातेवाइकांच्या मते, एका पोलिस कर्मचाऱ्याने मोटारसायकलवरून केलेल्या पाठलागामुळे हे अपघातग्रस्त तरुण टिपरखाली आले. संतप्त नातेवाइकांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या अटकेसाठी आणि निषेधार्थ घटनास्थळी मृतदेहाभोवती कडे करून रस्ता रोखून धरला. वेळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी नातेवाइकांच्या म्हणण्याप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने नातेवाइकांनी मृतदेह उचलण्यास परवानगी दिली.

मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर संतप्त नातेवाइकांचा जमाव वेळापूर पोलिस स्टेशनमध्ये येऊन अपघातग्रस्त तरुणांचा विना गणवेश पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरून पोलिस स्टेशनच्या समोरील अकलूज – सांगोला रस्त्यावर ठिय्या धरला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अकलूज उपविभागीय अधिकारी धीरज राजगुरू यांनी वेळापूर येथे धाव घेऊन सूत्रे आपल्या हाती घेतली. वेळापूर पोलिसांकडून गुन्हे नोंद करण्याचे काम सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!