महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना श्रेय देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक नवीन योजना लागू करण्याचा सरकारचा प्लान आहे. ठाकरे त्यांच्या नावानं ग्रामीण विकासासंबंधित एक योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. शरद पवार यांच्या नावाने ‘शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना’ लागू करण्याच्या तयारीत असून यासंदर्भात लवकरच मंत्रिमंडळात निर्णय होण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्या नावे असलेली ही योजना देशपातळीवरील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या योजनेशी जोडण्यात येणार आहे. ही योजना लागू झाल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडून येणार आहेत. या योजनेचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भाग समृद्ध करणे हा आहे, असा दावा राज्य सरकार कडून करण्यात येत आहे. दरम्यान, या योजनेची अंतिम रुपरेखा राज्य सरकारने अद्याप निश्चित केली नसून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.