---Advertisement---

सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ ; जाणून घ्या आजचा दर

On: December 5, 2020 11:29 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ केली आहे. आज पेट्रोल २७ पैसे तर डिझेल २५ पैशांनी महागले. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३ पार गेला आहे. मुंबईत देखील पेट्रोल डिझेलमधील दरवाढ सुरुच आहे.

आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ८९.७८ रुपये आहे. डिझेलचा भाव ७९.९३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.१३ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.३२ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६ रुपये झाला असून डिझेल ७८.६९ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८४.६३ रुपये असून डिझेल ७६.८९ रुपये आहे.

दरम्यान कमॉडिटी बाजारात तेलाचा भाव शुक्रवारी १.०३ टक्क्यांनी वधारला आणि तो प्रती बॅरल ४६.०६ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव १.१३ टक्क्यांनी वधारून ४९.२५ डॉलर प्रती बॅरल झाला. तेलाचा भाव लवकरच ५० डॉलरच्या घरात जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!