---Advertisement---

सायना नेहवालला कोरोनाची लागण ; थायलंड ओपन स्पर्धेपूर्वीच भारताला मोठा धक्का

On: January 12, 2021 5:45 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे भारताला थायलंड ओपन स्पर्धेपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सायनाला रुग्णालयातच क्वारंटीन करण्यात आलं आहे.

सायना थायलंड ओपनसाठी भारतीय खेळाडूंसोबत थायलंडला गेली आहे. १२ जानेवारीपासून थायलंड ओपन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेाधीच सायनाला कोरोनाची लागण झाल्याने सायनासह भारताला धक्का बसला आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे सायनाला मोठा धक्का बसला आहे. कारण, १२ ते १७ जानेवारी पर्यंत योनेक्स थायलंड ओपन स्पर्धा होणार आहे. त्यानंतर १९ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान टोयोटा थायलंड ओपन आणि २७ ते ३१ जानेवारी दरम्यान BWF वर्ड टूर फायनल्स होणार आहेत. कोरोनाच्या महामारीनंतर १० महिन्यांनी सायना नेहवाल बॅडमिंटनच्या कोर्टवर उतरणार होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!