---Advertisement---

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….

On: December 3, 2020 2:46 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई – महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून होत असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या नावाच्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही, त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस आहे, असं स्पष्ट करत शरद पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. एका मराठी वृत्तपत्राला मुलाखत देतांना शरद पवार म्हणाले आहे.

 

महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून आपण सुप्रिया सुळे यांच्याकडे बघता का?, असा प्रश्न शरद पवार यांना केला. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे, सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही. त्यांचा इंटरेस्ट नॅशनल पॉलिटिक्समध्ये आहे, पार्लमेंटमध्ये आहे. त्यांना सर्वोत्तम संसदपटूचे पुरस्कारही मिळालेत आहेत. ते पुढे म्हणाले,‘प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो, तो इंटरेस्ट त्यांचा तिथे आहे.’

दरम्यान , सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील अशी चर्चा काही पासून राज्याच्या राजकारणात सुरू असतांना शरद पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!