अक्कलकोट, दि.३ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दुधनी बाजार समितीचे विद्यमान सभापती सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पार्थिव देहावर शनिवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा अक्कलकोट तालुक्याबरोबरच आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये मोठा जनसंपर्क असल्याने सकाळपासूनच प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यांनी दुधनी शहराकडे धाव घेतली होती.त्यामुळे दुधनीत प्रचंड गर्दी उसळली होती.त्यांच्या राहत्या घरापासून दुपारी अडीचच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली.त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा गांधी चौक,सिद्धेश्वर चौक,नागोबा नगर,सय्यद बाहोद्दीन चौक,सिननुर नाका मार्गे मैंदर्गी नाक्या जवळील त्यांच्या शेतात पोहचली.दुपारी साडेचारच्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी,
आमदार विजयकुमार देशमुख,आमदार सचिन कल्याणशेट्टी,इंडीचे आमदार यशवंतगौडा पाटील,सिद्धेश्वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी,अफजलपुरचे अरुणकुमार पाटील,आळंदचे बी.आर.पाटील, आर.के .पाटील,हर्षानंद गुत्तेदार,हिरेजेवर्गी मठाचे जयगुरूशांतलिंगाराध्य महास्वामी, बडदाळ
मठाचे डॉ. चन्नमल्ल शिवाचार्य महास्वामी, नागणसूर
मठाचे रेवणसिद्धेश्वर महास्वामी,अबेतुमकूरचे डॉ.गंगाधर महास्वामीजी,बडदाळचे डॉ.चनमल्ल शिवाचार्य महास्वामीजी,दुधनीचे डॉ. शांतलींग महास्वामी ,जळकोटचे महास्वामीजी,इब्राहिमपुरचे महंत महास्वामी,मादन हिप्परगाचे अभिनव शिवलिंग महास्वामी यांच्यासह माजी आमदार सिद्रामप्पा पाटील,शिवशरण पाटील,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, शिवराज म्हेत्रे,प्रथमेश म्हेत्रे,मल्लिकार्जुन पाटील,सुरेश हसापुरे,महेश इंगळे,निंबाळचे जिल्हा परिषद सदस्य गुरुशांत पाटील,महादेव कोगणुरे,कर्नाटकचे नितीन गुत्तेदार, चेतन नरोटे, सुधीर खरटमल,मल्लिकार्जुन काटगाव,नसरोद्दीन मुतवल्ली,अमोलराजे भोसले,आंनद तानवडे, बसलिंगप्पा खेडगी ,संजय देशमुख,अशपाक बळोरगी, सातलींग शटगार, दिलीप सिद्धे, सुनील बंडगर,विनोद भोसले,केदार उंबरजे,डॉ.दिनकर नारायणकर,दिलीप बिराजदार, भीमाशंकर कापसे, मंगल पाटील, धनेश अचलारे, शिवानंद माड्याळ, सुभाष परमशेट्टी, शिवशरण हबशी, गुलाब खैराट, उत्तम गायकवाड, विलास गव्हाणे, अहमद पीरजादे,भगवान शिंदे,दत्ता शिंदे,व्यंकट मोरे, मोतीराम राठोड, सिद्धाराम भंडारकवठे,राजशेखर दोशी, शिवानंद हौदे, गिरमल्लप्पा सावळगी,रामचंद्र गद्दी, राजू म्हेत्रे, मुगळी मठाच्या महानंदाताई मुगळी आदींची उपस्थिती होती.
अक्कलकोट तालुक्याचे जेष्ठ नेते कै. सातलिंगप्पा म्हेत्रे हे दुधनी नगरपालिकेचे सलग ४० वर्षे नगराध्यक्ष होते.त्यांनी आपल्या अथक परिश्रमाने दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव राज्यात अव्वलस्थानी आणले होते. सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीच्या जोरावर दुधनी भागासह संपूर्ण अक्कलकोट तालुका,विजापूर,गुलबर्गा सीमावर्ती भागात वेगळी ओळख निर्माण केली होती.तालुक्याच्या राजकीय पटलावर त्यांचा मोठा दबदबा होता.दुधनीसह तालुक्यातील अनेक वर्षापासूनचे भांडणतंटे म्हेत्रे यांनी त्यांच्या लोकन्यायालयातुनच मिटविले.
धर्मकार्य आणि गोरगरिबांना दानधर्म करण्यासाठी सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे नेहमीच हात पुढे असायचे. आज शरीराने ते आपल्यात राहीले नसले तरी त्यांच्या जीवनातील लोक सेवेच्या कर्तृत्वामुळे ते सर्वांच्या स्मृतीत चिरकाल अजरामर राहतील. त्यांच्या जाण्याने म्हेत्रे कुटुंबीयांत जी पोकळी निर्माण झाली आहे.ती कधीही न भरून निघणारी आहे,अशा प्रकारची भावना अनेक मान्यवरांनी शोकसभेत बोलताना व्यक्त केली.