---Advertisement---

हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

On: December 12, 2020 11:38 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा  वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शरद पवार यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांना तसेच पार्थ पवारांनी आपल्या आजोबांना बरोबर 12 वाजता ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला, आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना करतो, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

पार्थ पवारांनी म्हटलं आहे की, देशातील एका मोठ्या उंचीच्या नेत्याच्या शुभेच्छा, पवार साहेब खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपण सर्वांसाठी प्रेरणा आहात, तरूणांना नेहमीच समाजसेवेसाठी मार्गदर्शन करत असता. आपणाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, असे पार्थ यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!