ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हैद्रा कन्नड शाळेत कोरोना काळातही नियमित ऑनलाईन अभ्यास, तंत्रस्नेही शिक्षक धरेप्पा कटगेरी यांनी गुगुल मीटद्वारे दिले विज्ञानाचे धडे

 

अक्कलकोट ,दि.१२ : अक्कलकोट
तालुक्यातील हैद्रा येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत कोविड-19 महामारी मुळे सध्या शाळा बंद असून सुद्धा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तंत्रस्नेही शिक्षक धरेप्पा कटगेरी यांनी गुगुल मीटद्वारे नियमित आँनलाइन अभ्यास देत आहे.

शाळेतील विषय शिक्षक धरेप्पा कटगेरी यांनी 17 मार्चपासून 2020 पासून 6 वि 7 वी मधील विध्यार्थी व पालकांशी  संपर्क साधून वाट्सप ग्रुप तयार करून नियमित ऑनलाईन अभ्यास घेत आहेत. सामान्य विज्ञान,मराठी, हिंदी विषयाचे परिपूर्ण अभ्यास ,नियमित चाचण्या,26 व्हिडीओ तयार करुन, घरी बसून नाविन्यपूर्ण विज्ञानातील प्रयोग सर्व शैक्षणिक साहित्य वापर करून गुगल मीट अँप द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत नियमित पोहचून शाळा बंद पण शिक्षण चालू ठेवलेले आहेत. पालकांच्या भरपूर प्रतिसाद मिळाला आहे.तसेच सामाजिक अंतर ठेवून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन पालकाना त्यांच्या मुलांच्या अभ्यासातील प्रगती आत्मसाथ करून दिले आहे. मुलांना गायन, रांगोळी, चित्रकला,निबंध, सुंदर अक्षर, भाषण, असे विविध प्रकारचे उपक्रम स्पर्धा घेतली आहे.
शैक्षणिक कामासाठी शाळेतील मुख्याध्यापक सूर्यकांत कोनळळी,संजीवकुमार सुतार,रमेश होर्ती, राजशेखर खानापुरे,काशिनाथ कोळी,सोमणणा कुंभार,शशिकला कलशेट्टी,परमेश्वर चौधरी आदी सहकारी शिक्षकांच्या सहकार लाभत आहे. गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे, विस्तार अधिकारी रतिलाल भुसे , नागणसूर केंद्राचे केंद्रप्रमुख गुरूनाथ नरूणे, देविदास वाघमोडे, मुख्याध्यापक सूर्यकांत कोनळ्ळी व केंद्रातील सर्व शिक्षक अभिनंदन केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!