---Advertisement---

कृषि विधेयक मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने 2 कोटी स्वाक्षरी मोहीम,सोलापूरात 13 ऑक्टोबरपासून सुरुवात

Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर, दि.१३ : सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू होणार
आहे.

13 ऑक्टोबरपासून शहरातील सर्व वार्डातून ही
मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याकरिता सोलापुर शहर युवक काँग्रेसची बैठक नुकतीच पार पडली.यावेळी युवक काँग्रेसचे प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या वार्डातुन किमान 1 हजार नागरीकांची स्वाक्षरी मोहीम घ्यायला पाहिजे,असे अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी सांगितले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस विनोद भोसले, योगेश मार्गम, विवेक कंन्ना , सैफन शेख, तिरुपती परकीपंडला यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!