ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी विहित वेळेत खर्च करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी व सर्व समाज घटकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे सर्व विभागांनी कामे प्रस्तावित करावीत. नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी विहित वेळेत व 100 टक्के खर्च कराअसे निर्देश महसूलपशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हा नियोजन वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन सभागृह येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीशहर पोलीस आयुक्त राजेंद्र मानेपोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडेमहापालिका आयुक्त पी. शिवशंकरजिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधला जावा. पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. त्यामुळे हा निधी 100 टक्के खर्च व्हावायासाठी प्रत्येक खाते प्रमुखाने नियोजन करावे. 2021-22 च्या मंजूर कामांकरिता दायित्व निधीची मागणी केली नसल्यास तातडीने दायित्व निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पार्शवभूमीवर 2022-23 साठी प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने निधी मागणी प्रस्ताव सादर करावेत. आय पास प्रणालीचा प्रभावी वापर करावा. तसेच परफॉर्मन्स व सोशल ऑडिट करावे. मिळणारा प्रत्येक पैसा सामान्यांच्या कल्याणासाठी खर्च होईलयासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. तसेच सौर ऊर्जेचा वापर होण्याच्या अवलंब करावाअशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामे व निधीची मागणी यांची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022-23 करिता सोलापूर जिल्ह्याकरिता 527 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी विविध खाते प्रमुखांनी त्यांच्या विभागामार्फत प्रस्तावित कामेत्यासंबंधीच्या मान्यतासद्यस्थिती यांची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!