दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा मेगा विस्तार आज संध्याकाळी सहा वाजता दिल्लीत पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाटेलाचार महत्वाची खाते महाराष्ट्राच्या वाटेला मिळाली आहेत. माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्याकडे मध्यम व लघु उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारती पवार यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पद देण्यात आले आहे.कपिल पाटील पंचायतराज मंत्री असणार आहेत. तर भागवत कराड यांना अर्थ राज्यमंत्री पदाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली आहे.केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्यातुन केंद्र सरकारने कोरोना संकट हाताळण्यात प्रचंड अपयशाची जणू स्पष्ट कबुली दिली आहे. असे काँग्रेसने म्हंटले आहे.सर्वकाही चांगलं झाल्यास मोदी श्रेय मोदी घेणार, मात्र उलट घडल्यास संबंधित मंत्र्यांना जवाबदार धरला जाणार, अशी प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली आहे.
कोरोना संकट हाताळणीतील गैर व्यवस्थापनाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन जवाबदार आहे. या प्राधिकरणाचे नेतृत्व पंतप्रधान करतात. अपयशाची जवाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार का, की फक्त डॉ. हर्षवर्धन यांना केवळ बळीचा बकरा बनवणार ? असा बोचरी सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला ट्विटरवर केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाव न घेता टीका केली आहे. सर्वोच्च स्थरावरील अपयशासाठी डॉ. हर्षवर्धन यांना बळीचा बकरा बनविण्यात आली आहे असे त्यांनी म्हंटले आहेत.