---Advertisement---

नारायण राणे समर्थकांनी सोलापुरात फटाके फोडून साजरा केला जल्लोष

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात भाजपने आज स्थान देत शपथ दिल्याबद्दल सोलापुरात राणे समर्थकांनी एकच जल्लोष करत मिठाई वाटली आहे.

येथील चार पुतळा येथे माजी नगरसेवक सुनील खटके , सागर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जमून तरुणांनी मिठाई वाटत फटाके फोडून जल्लोष केला आहे.भाजपने नारायण राणे यांना स्थान दिल्याने भविष्यात भाजपला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असे मत राणे समर्थक माजी नगरसेवक सुनील खटके यांनी यावेळी व्यक्त केलंय.

यावेळी माजी नगरसेवक सुनील खटके, सागर शिंदे, राहुल जाधव, गजू शिंदे, आकाश गायकवाड, प्रभाकर भुसारे, सागर माने, जाकीर शेख, अभिषेक जाधव, राज वाघमारे, दिनेश झांबरे, शुभम जाधव, वैभव खटके, आप्पा आवळे, हर्ष गायकवाड, गोपाळ घुमरे, अजय कांबळे, समर्थ भोसले, आदित्य भोसले, यश खटके, गणेश आसबे, आदींसह राणे समर्थक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!