मुंबई : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीने दणका दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे.
मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांना 12 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
ईडीने एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याच दरम्यान एकनाथ खडसे हे 8 जुलै रोजी एक पत्रकार परिषद घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जाहीर केले होते.मात्र काही तासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर आणखीन एक ट्विट करून माहिती देण्यात आले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या प्रकृती खालावल्याने त्यांची दिनांक 8 जुलै रोजीची पत्रकार परिषद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. @EknathGKhadse हे उद्या, दि. ८ जुलै २०२१ रोजी स. १० वा. पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
स्थळ- नवीन राष्ट्रवादी भवन,जे.एन.हेरेडिया मार्ग बॅलार्ड इस्टेट, मुंबई
सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रतिनिधींनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती!
— NCP (@NCPspeaks) July 7, 2021
आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास समन्स बजावण्यात आल्याने ही पत्रकार परिषद होते की नाही हे पहावं लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावल्याने त्यांची उद्या दि. ८ जुलै रोजीची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे. माध्यमकर्मींनी कृपया याची नोंद घ्यावी. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. धन्यवाद.
— NCP (@NCPspeaks) July 7, 2021