ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त वागदरी येथे वृक्षारोपण ; अक्कलकोट भाजपचा उपक्रम

अक्कलकोट : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही अनेक राजकीय घडामोडीत आपल्या प्रखर राष्ट्रवादी विचारांचा परिचय करून दिला.  त्यातूनच जम्मू काश्मीरला ३७० व्या कलमाद्वारे विशेष दर्जा देण्याच्या तत्कालीन नेहरू सरकारच्या विरोधात त्यांचा लढा सुरू झाला.अखेर दोन वर्षांपूर्वी हे कलम रद्द करून डॉ.मुखर्जी यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केल्याचे प्रतिपादन भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड यांनी केले.

ते भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने वागदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित वृक्षारोपण अभियान कार्यक्रमात बोलत होते.यावेळी विविध प्रकारची वृक्षे प्राथमिक आरोग्य केंद्रात लावण्यात आली.

या कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब बिराजदार, तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील, ग्रा.प.सदस्य श्रीशैल ठोंबरे, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते गुंडप्पा पोमाजी,शिरवळ पंचायत समिती सदस्य राजू बंदीछोडे, सरपंच संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप जगताप,माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकुमार ढोपरे,गोगावचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे,डॉ.साधना पाटील,सरपंच सतीश कणमुसे,सुनील सावंत, संतोष पोमाजी,प्रकाश पोमाजी,बसवराज पाटील, राजकुमार मंगाणे, हनिफ मुल्ला, लक्ष्मण सोनकवडे, राजकुमार हुग्गे,रवी भीमपुरे, बसवराज उंबराणे व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
महादेव सोनकवडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!