---Advertisement---

ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात राहुल गांधींच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : उर्जामंत्री नितीन राऊत आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अचानक दिल्ली दौरा केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सध्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात सध्या वाद असल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात सुरू होत्या.

काँग्रेसमध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून देखील वाद पेटल्याची चर्चा आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे विधानसभा अध्यक्षपद अजूनही रिक्त आहे. अद्याप काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद मिळालं नाही. या अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे.

नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात आज राहुल गांधी यांची खास भेट घेऊन पक्षांतर्गत असलेल्या वादावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत विधानसभा अध्यक्षपदावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!