---Advertisement---

हिंगणघाटचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : हिंगणघाटचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे शिवसेनेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे उपनेते व माजी राज्यमंत्री अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

शिवसेनेतील अंतर्गंत वाद व पक्षातील वरिष्ठ नेतृत्वानं योग्य ती दखल न घेतल्याने अशोक शिंदे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आज दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत अशोक शिंदे पक्ष काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

अशोक शिंदे शिवसेनेकडून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजप उमेदवाराकडून पराभव झाला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शिवसेना सरकारमध्ये शिंदेकडे राज्यमंत्रिपद देण्यात आले होतं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!