ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरून काढला : तानवडे

अक्कलकोट, दि २३: वागदरी जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वाधिक निधी आणून या मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. यातून विकासाचा अनुशेष भरून काढला आहे, यापुढे ही प्रक्रिया आणखी जोमाने चालू ठेवू, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी केले.

अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे ३ कोटी ३३ लाख रुपये विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ व लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

हा कार्यक्रम श्री महादेव मंदीरात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते सुरेश त्रिगुळे हे होते. पुढे बोलताना तानवडे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणात भाजपा व समविचारी पक्ष सत्ताकेंद्रात आले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्तेच्या समीकरणात तालुक्यातील भाजपा व काँगेस एकत्रित आले. त्यामुळे जि.प च्या सर्व सदस्यांना आपल्या मतदार संघात भरघोस निधी खेचून आणता आले. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून माझ्या वागदरी जि.प गटातील गावांना निधीच्या माध्यमातून खूप मोठा फायदा झाला, असेही तानवडे सांगितले.

सत्तेच्या समीकरणाचा फायदा अक्कलकोट तालुक्याला मोठा झाला आहे. या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वच मतदार संघांमध्ये खूप मोठा निधी आला आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमास शेकप्पा कलकुटगे, आप्पासाहेब किवडे, सुभाष किवडे, राजेभाई मुजावर श्रीकांत भैरामडगी, सैपन सुभेदार, दत्तात्रय धर्मसाले, प्रकाश पोमाजी, अशोक बंदीछोडे, रमेश चिनगुंडे, गंगाधर बिराजदार, विठ्ठल कत्ते,सतीश कणमुसे, शंकर गुमते, विलास सुरवसे,शशिकांत कोळी,चनबसप्पा किवडे, महेश कोतले, दत्ता कोतले, शिवानंद किवडे, श्रीशैल कोतले,  सिद्धराम त्रिगुळे, आप्पासाहेब वागदरे, काशिनाथ कोतले, महादेव पाटील,  महांतेश आलूरे, सुशील फुलारी,  परमेश्वर परशेट्टी, अब्दुल मकानदार, अल्ताफ फकीर, उमेश साळुंखे, अब्बासली दिवटे, राजेंद्र जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश माशाळे यांनी केले. प्रास्ताविक धर्मेंद्र गायकवाड यांनी तर आभार सुशील फुलारी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!