ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनी नगरपरिषदेची प्लास्टीक बंदी मोहिम, पन्नास किलो प्लास्टिक जप्त,पंधरा हजार रुपये दंड वसूल

दुधनी : शहरातील व्यापार्याकडुन प्रतिबंधीत प्लॅस्टिक व प्लॅस्टीकच्या वेगवेग़ळ्या वस्तुंचा वापर व विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नगर परिषदेच्यावतीने सिंगल युज प्लासटीक विरोधात मोहिम राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाने दि. २३ मार्च २०१८ च्या अधिसूचनेद्वारे राज्यात प्लास्टिक व तत्सम अविघटनशिल वस्तूच्या उत्पादन, साठा, विक्री व वापरावर बंदी घातलेली आहे. शहर क्षेत्रात शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून प्लास्टिक व तत्सम अविघटनशिल वस्तूच्या वापरामुळे पर्यावरणाचा होणारा –हास याबाबत जनजागृती केली जात आहे.

दुधनी नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अतिश वाळुंज, कार्यालय अधिक्षक सी.एस. कोळी व कर्मचारी राणी दाइंगडे, आर.एस.अत्ते, सी.बी.पाटील, मल्लिनाथ म्हेत्रे, गुरुशांत मगी, बी.बी.कुर्ले यांच्या पथकाने प्लास्टीकबंदी मोहिमेअंतर्गत दि. २१ सप्टेंबर २०२१ रोजी शहरातील दुकाने, हॉटेल्स, भाजी मार्केट, शासकीय व निमशासकीय आस्थापनांची तपासणी करीत कारवाई दरम्यान ५० किलो प्लास्टीक जप्त केले. तसेच दंडात्मक कारवाईतून रुपये १५,०००/- दंड वसुल करण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी यांनी सिंगल यूज प्लास्टिक मुक्त शहर करणेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करुन शहर प्लास्टिक मुक्तीची स्वयं घेषणा करण्याचा मानस बोलून दाखवला व शहरातील नागरिकांनी सार्वजनिक स्वच्छता राखावी व प्लास्टीकचा वापर टाळण्याचे आवाहन केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!