सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवार दि २६ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून दैनिक वृतपत्र व वृत्तवाहिन्याच्या पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. रविवार दि २६ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता पत्रा तालीम जवळ सळई मारूती मंदिर येथील सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेश पवार, नीलकंठ को आँप. बँकेचे चेअरमन चंद्रकांत तापडीया, नीलकंठ को आँप बँकेचे संचालक धनराज नोगजा, लाकमे अकॅडमीच्या संचालिका शर्मिला जंगे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळयास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक महेश कासट, संतोष अलकुंटे , मल्लिकार्जुन यणपे, नितीन कुलकर्णी, दिपक बुलबुले, अभिजीत होनकळस, शुभम हंचाटे, गणेश येळमेली यांनी केले आहे.
हे आहेत पुरस्काराचे मानकरी
- किरण बनसोडे (लोकवार्ता),
- प्रशांत जोशी (संचार),
- सादिक इनामदार (पुण्यनगरी),
- राजेश कुलकर्णी (इन न्यूज चॅनेल),
- संतोष आचलारे (पुढारी),
- आप्पासाहेब पाटील (लोकमत),
- माधवी कुलकर्णी (दिव्यमराठी),
- प्रमिला चोरगी (सकाळ)
आदी पत्रकारांचा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह ,सन्मान पत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.