सत्ता नसतानाही विकास कामे करण्याची धमक काँग्रेसमध्ये : म्हेत्रे, गुरववाडीत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
अक्कलकोट, दि.३ : काँग्रेसच्या कारकिर्दीत तालुक्यात अनेक विकासाची कामे झाली आहेत तोच धडाका आजही कायम आहे.यामुळे आमचे कार्यकर्ते, नेते,पदाधिकारी आजही स्वतःच्या हिंमतीवर विकासकामे करू शकतात तितकी ताकद आम्ही त्यांना दिली आहे, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी येथे २५ लाख रूपयेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमीपुजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य आंनद तानवडे हे होते. पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की, सरपंच पुजारी हे गुरववाडी गावच्या विकासासाठी सतत धडपडत असतात. त्यांचे काम या भागात चांगले आहे.मी आमदार असताना देखील या गावाला भरपूर निधी दिला आहे. काँग्रेसचे या गावावर लक्ष आहे.गुरववाडी गावाने यापुढे देखील आमच्या पाठीशी राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना तानवडे यांनी म्हाळप्पा पुजारी यांनी केलेल्या विकास कामाचे कौतुक केले. मल्लिकार्जुन पाटील म्हणाले की, पुजारी हे फक्त विकास कामे करण्यात मग्न असतात. त्यांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे. या भागात काँग्रेसचे सक्षम नेतृत्व आहे, असे म्हणाले.
या कार्यक्रमास दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, पंचायत समिती सभापती अॅड आनंदराव सोनकाबंळे, जि.प.सदस्य आनंद तानवडे, मल्लीकार्जुन पाटील,मल्लिनाथ भासगी, दत्ता डोगंरे, सरपंच लक्ष्मीबाई पुजारी,म्हाळप्पा पुजारी, महेश पुजारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.