अक्कलकोटसह संपूर्ण राज्यात यंदा ललिता पंचमी मोठ्या प्रमाणात साजरी होणार; समर्थ नगरी प्रतिष्ठानचा उपक्रम
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट ,दि.२५ : ललीता पंचमी श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोट येथील आगमन दिवस या दिवशी खंडोबा मंदिरात प्रथम स्वामींनी दर्शन दिले. तो अक्कलकोटकराचा व स्वामी भक्तांचा भाग्याचा दिवस, महाराजांनी भ्रमण करून अक्कलकोट हे मुळस्थान म्हणून निवडल याकरिता त्यांच्या स्वागतानिमित्त तो दिवस समर्थ नगरी परिवाराच्यावतीने शुक्रवार (दि.३० सप्टेंबर) रोजी अक्ककलकोटसह महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळेस एकत्रीत नामस्मरणामध्ये साजरा करण्यात येणार आहे.
या उत्सवात सर्वानी सहभागी होऊन स्वामी चरणी आपली सेवा रूजू करून स्वामींचे स्वागत करावे,असे आवाहन डॉ. मनोहर मोरे यानी केले .ललीता पंचमी निमित अक्कलकोट येथील श्री उपलप विठ्ठल मंदिर एवन चौक येथे एकत्रीत नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ नगरी प्रतिष्ठानचे डॉ.मनोहर मोरे यानी अक्कलकोटकराना पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळ, वे. शा.सं. अण्णू महाराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थनगरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांच्या नियोजनानुसार मिरज, तासगाव, पुणे, कोल्हापूर, चिक्कोडी, रत्नागिरी, भुईगाव, बोरीवली, ठाणे, भांडुप, नाशिक, लातुर, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर आदिसह वेगवेगळ्या ठिकाणी स्वामीनामाचे प्रसार करत ललीता पंचमी या दिवसाचे महत्त्व पाठवून देण्यात आले व एकत्र बसून नामस्मरण करतील असे नियोजन करून करण्यात आले आहे, असे महिला समितीच्या अध्यक्षा सुखदा ग्रामोपाध्ये यानी सांगितलेे.
मानसी जाधव,आरती काळे, शुभांगी पाठक, कावेरी धरणे, अश्विनी शिंपी, प्रियांका अजगोंडा, दिपा कोकण आदि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अक्कलकोट शहरात ललीता पंचमी नामस्मरण सोहळ्याची जनजागृती करण्याचे कार्य चालू असून जास्ती -जास्त नागरिकांमध्ये अध्यात्माची ज्योत पाठविण्याचे प्रयत्न चालू आहे.
अध्यक्ष सिद्राम वाघमोडे,भिमराव धडके, ओंकार पाठक, प्रकाश उण्णद, चंद्रप्रकाश उदगीरी, सुभाष तारापुरे, राहूल होटकर, कुमार पतंगे आदींच्या माध्यमातून शहरात एकत्रीत स्वामी प्रतिमेचे पुजन व एकाच वेळी आरतीचे नियोजन करण्यात येत आहे,अशी माहिती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आली.