पालकमंत्री विखे-पाटील स्वामींचरणी नतमस्तक, विखे-पाटील कुटुंबीयांच्या ठाई स्वामी भक्तीचा ध्यास – महेश इंगळे
अक्कलकोट : राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन विजयादशमीच्या पुर्वसंध्येस श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले, तसेच श्री वटवृक्ष मंदिरात गाभारा नूतनीकरण असेल, मंदिर परिसर सुशोभीकरण हे सर्व पाहून मनाला अत्यंत आनंद झाला असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला.
याप्रसंगी महेश इंगळे यांनी बोलताना गेल्या अनेक वर्षापासून विखे-पाटील कुटुंबीयांच्या ठाई स्वामी भक्तीचा ध्यास आहे. कै.बाळासाहेब विखे-पाटील हे नेहमी मंदिरात आल्यानंतर माझे वडील व या मंदीर समितीचे तत्कालीन माजी चेअरमन कै.बाळासाहेब इंगळे यांची आवर्जून भेट घेवून मंदीर समितीच्या कार्याबद्दल आस्थेने चौकशी करत असत.वडील कै.बाळासाहेब इंगळे यांच्याशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते याही आठवणींना त्यांनी याप्रसंगी उजाळा दिला.
याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत सोलापूरचे आमदार व माजी मंत्री सुभाष बापू देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, प्रांताधिकारी सुमीत शिंदे, अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, भारतीय जनता पार्टी अक्कलकोट तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, आरपीआय तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, नगरसेवक महेश हिंडोळे, बाळा शिंदे, ननू कोरबू, संजय बडवे, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते.