---Advertisement---

२२ वर्षीय महिलेने हातावर सुसाईड नोट लिहून संपविले आयुष्य : सोलापूर जिल्ह्यात खळबळ !

By team
On: February 22, 2026 5:24 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी आयुष्य संपविल्याच्या घटना घडत असताना आता सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्य सावरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेने कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. या विवाहितीने फलटण येथील महिला डॉक्टरसारखेच आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.पायल रणदिवे (22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पायलला ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी तिने क्लासही लावला होता. पण तिच्या कुटुंबीयांनी तो क्लास बंद केला. यामुळे ती व्यथित झाली होती. तिने शनिवारी सायंकाळी घरात कुणी नसल्याचे पाहून आत्महत्या केली. तत्पूर्वी, तिने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात तिने आपल्या नवऱ्यासह सासरच्या मंडळींवर कौटुंबीक छळाचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण व जखमांच्या खुणाही आढळल्या आहेत. त्यानुसार, तिच्या वडिलांनी तिच्या पतीसह सासू, सासरे व दिराविरोधात शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार, पोलिसांनी पायलचा पती शशिकांत रणदिवे व सासू-सासऱ्यांना अटक केली आहे. तर फरार दिराचा शोध घेतला जात आहे. पोलिस अटकेतील आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

पायलने मृत्यूपूर्वी काय लिहिले होते हातावर?

पायलने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर एक मजकूर लिहिला होता. त्यात सासरच्या मंडळींनी आपला कसा छळ केला हे विस्तृतपणे लिहिले आहे. ती म्हणते, हसू झालंय माझं. माझं पार्लर बंद केले. जीव होता तो माझा. स्वप्न होतं ग. आजपर्यंत शांत बसले, पण आता नाही. चांगल्या आई-बापाची लेक आहे म्हणून निघूनही गेले नाही. माझ्यामुळे त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते. सॉरी.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!