नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील भाजपचे वाढत असलेले ताकदीला थांबविण्यासाठी कॉंग्रेससह सर्वच विरोधकांनी एकत्र येत आघाडी उघडली आहे मात्र, आता कॉंग्रेसच्या एका खासदारांने भ्रष्टाचारा नवा विक्रम गाठला आहे. काँग्रेस खासदार धीरज साहू व त्यांच्या निकटवर्तीयांकडून ३०० कोटींची कॅश जप्त करण्यात आलीये. साहु हे झारखंडमधून खासदार आहेत. विविधी ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्टीवर छापे मारण्यात आले. यात झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील १० ठिकाणांचा समावेश आहे. इथं आयकर विभाग तपास करत आहे.
प्राप्तिकर अधिकार्यांच्या मते, एका कारवाईत वसूल करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. करचोरी प्रकरणात बुधवार ६ डिसेंबरपासून धीरज यांच्याविरोधात कावराई सुरुये. त्यांच्या घरावर, कार्यालयावर आणि कारखान्यावर छापे टाकण्यात आलेत. रांचीमध्ये गेल्या ३ दिवसांपासून तपास करणारे फक्त भाकरी आणि केळी खाऊन पोट भरत आहेत. या घरातून तपास अधिकाऱ्यांना तीन बॅगा सापडल्या आहेत. ओडिशातील वाहनंही जप्त करण्यात आलीयेत. आयकर विभागाला ओडिशातील टिटलागढ, बोलंगीर आणि संबलपूर येथील ठिकाणांहून आतापर्यंत ३०० कोटी रुपये रोख मिळाले आहेत. शनिवार ८ डिसेंबरपासून नोटा मोजण्यासाठी ४० लहान-मोठी मशिन बसवण्यात आल्यात. तरी अजूनही नोटांची मोजणी सुरू आहे.
आयकर विभागाचे महासंचालक संजय बहादूर यांनी प्रसारमाध्यमांना याबद्दल माहिती दिली. ते म्हणाल की, “कऍश इतकी आहे की ती मोजण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील. त्यानंतरच याबाबत अधिकृत माहिती देता येईल.” मात्र, शेल्फमध्ये किती रोकड होती, याची माहिती आयटी पथकाने दिलेली नाही. लॉकर्स उघडणे बाकी आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत २६० कोटी रुपयांची रोकड प्राप्त झाली होती. त्यानंतर ही रक्कम वाढतच गेली. यानंतर शुक्रवारी आयकर विभागाने ओडिशातील टिटलागडमध्ये दारूचा व्यवसाय करणाऱ्या संजय साहू आणि दीपक साहू यांच्या घरातून आठ कोटी रुपये जप्त केले. राईस मिलर आणि ट्रान्सपोर्टर राजकिशोर जैस्वाल यांच्या परिसरातूनही मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. कपाटात बराच वेळ ठेवल्याने नोटा ओलसर झाल्या होत्या. त्या नोटा एकमेकांना चिकटल्या होत्या. नोटा मोजताना आतापर्यंत चार मशिन बिघडल्यात. त्यामुळे मोजणीला विलंब होतोय. आता भुवनेश्वरहून मोठी मशीन मागवण्यात आली आहे. इन्कम टॅक्सचा छापा पाहून बौध जिल्ह्यात असलेल्या बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ५००-५०० रुपयांच्या नोटा फाडून फेकण्यास सुरुवात केली. छापेमारीच्या वेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या बाउंड्री वॉलभोवती नजर टाकली असता त्यांना ५०० रुपयांच्या नोटा फाडून फेकून दिल्याचे आढळलं.