अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदार संघातील अक्कलकोट विधानसभा मतदार संघात शांततेत ५५.३१ टक्के मतदान झाले. सकाळी मतदारांनी सर्वत्र रांगा लावुन मतदान केले.किणी, बणजगोळ, तडवळ, इब्राहिमपूर, नन्हेगांव, अक्कलकोट शहरातील शहाजी प्रशाला या सहा ठिकाणी तांत्रिक कारणामुळे मशिन बंद पडल्याने बदलण्यात आले,अशी माहिती महसुल प्रशासनाने दिली.
गेल्या वेळसच्या लोकसभा निवडणुकीत ५६ टक्के मतदान झाले होते.यावेळी जवळपास मागच्या टक्केवारी एवढेच मतदान झाले.अक्कलकोट विधानसभा मतदार संघात १ लाख ८६ हजार ४९५ पुरुष तर १ लाख ७३ हजार ७४ व इतर ४१ असे एकुण ३ लाख ५९ हजार ६१० मतदार आहेत. त्यापैकी पुरुष १ लाख ६ हजार ५६० व स्त्री ९२ हजार ३३४ असे एकुण १ लाख ९८ हजार ९०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दुपारी एक वाजेपर्यंत एकुण २६.१० टक्के मतदान झाले. यामध्ये ५०२५५ पुरुष मतदार तर ४३५८२ स्त्री मतदार व इतर असे एकुण ९३८४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदानाचा वेग कमी होता. सकाळी नऊ वाजेपर्यंत १२३७५ पुरुष व ६३३० स्त्री असे एकुण १८७०५ मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. मतदानांची टक्केवारी ६.६४ टक्के पुरुष व ३.६६ टक्के असे एकुण ५.२० टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत २६ हजार ६०४ पुरुष व १७ हजार ७७४ स्त्री व इतर एक असे ४४ हजार ३७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ११ वाजेपर्यंत १४.२७ टक्के पुरुषाची मतांची टक्केवारी व स्त्री मतांची टक्केवारी १०.२७ टक्के तर इतर २.४४ टक्के असे एकुण १२.३४ टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत ५० हजार २५५ पुरुष व ४३ हजार ५८२ स्त्री इतर ४ असे एकुण ९३ हजार ८४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एक वाजेपर्यंत पुरुषांची टक्केवारी २६.९५ तर स्त्री यांची टक्केवारी २५.१८ तर इतर ९.७६ टक्के असे २६.१० टक्के मतदान झाले.
दुपारी तीन वाजेपर्यंत ७४ हजार ५९८ पुरुष व ६५ हजार ८७२ स्त्री इतर ४ असे एकुण १ लाख ४० हजार ४७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एक वाजेपर्यंत पुरुषांची टक्केवारी ४० टक्के तर स्त्री मतदार यांची टक्केवारी ३८.०६ टक्के तर इतर ९.७६ टक्के असे ३९.०६ टक्के मतदान झाले.दुपार नंतर सर्वच मतदानकेंद्रे उन्हाच्या तडाख्यामुळे ओस पडली. तापमान ४२ ते ४३ अशं सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. सायंकाळी चार वाजल्यानंतर मतदारांनी गर्दी करत मतदान केले.अक्कलकोट शहरातील वरिष्ठ शाळा, शहाजी प्रशाला, सेंट्रल स्कुल या ठिकाणच्या मतदान केंद्रावर रांगा लावुन मतदान केले. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. मतदारांमध्ये निरूत्साह होता. परगांवी राहणारे मतदार गावाकडे लक्झरी च्या माध्यमातून न परतल्याने मतदानाचा टक्का घसरला. सकाळच्या सत्रात महिलांनी गर्दी केली होती.शहाजी प्रशालेतील मतदान केंद्र क्रमांक १५६ येथे सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत सुमारे दीड तासभर मशिन बंद पडले होते. अकरा वाजता मशिन बदलुन मतदान सुरु झाले. परत माँकपोल घेऊन मशिन मतदानासाठी सुरू करण्यात आले.८७ मतदान झाल्यावर मतदान यंत्रातील बिघाडामुळे मतदान यंत्र बंद पडले.नंतर नवीन मशीन घेऊन मतदान सुरू करण्यात आले. तहसिलदार विनायक मगर यांनी भेट दिली. नागरिकांना सुमारे दीडतास ताटकळत राहावे लागले. कंट्रोल युनिट बीसीयुएएफ २०१९४ बंद पडले होते. बीसीव्हीईजे ६५६५० हे नवीन मतदार यंत्र वापरण्यात आले.
सेंट्रल स्कुल येथे १६५ मतदान केंद्रावर ओळख पटविण्यावरुन तक्रारी झाल्याने मतदान संथगतीने सुरु होते. मतदारांनी तक्रारी केल्या. मतदानाची वेळ संपल्यावर उभे असलेल्या २० जणांना चिठ्या देऊन मतदान घेण्यात आले. काही ठिकाणी दिव्यांग, जेष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांना खुर्चीवर बसवुन उचलुन मतदान केंद्रावर आणण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसारहैद्रा येथे चुरशीने सुमारे ६० टक्के, चप्पळगांव येथे सुमारे ६०.०३ टक्के, बावकरवाडी येथे ८१.७६ टक्के, नागणसुर येथे ५३.१५ टक्के, मैंदर्गी येथे सुमारे ५५ टक्के, किणी, वागदरी येथे प्रत्येकी ५८ टक्के, सलगर येथे सुमारे ५३.६१ टक्के, दुधनी नगरपरिषद येथे ४९.६२ टक्के, तडवळ येथे सुमारे ५६.५७ टक्के असे अक्कलकोट शहर व तालुक्यात पाच वाजेपर्यंत ४७.८५ टक्के मतदान झाले.