नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील डेसा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या कॅप्टनसह चार जवान शहीद झाले. एका पोलिसाचाही मृत्यू झाला आहे. म्हणजे एकूण 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिस सोमवारपासून येथे शोध मोहीम राबवत होते.
सविस्तर वृत्त असे कि, सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाला. शोध सुरू असताना गोळीबार करत दहशतवादी घनदाट जंगलात पळून गेले. यामध्ये पाच जवान गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहीद झालेल्या राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांमध्ये कॅप्टन ब्रिजेश थापा हे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगचे होते आणि कॉन्स्टेबल ब्रिजेंद्र आणि कॉन्स्टेबल अजय हे राजस्थानमधील झुंझुनूचे होते. नायक डी राजेश यांची माहिती समोर आलेली नाही. जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील डेसा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या कॅप्टनसह चार जवान शहीद झाले. एका पोलिसाचाही मृत्यू झाला आहे. म्हणजे एकूण 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिस सोमवारपासून येथे शोध मोहीम राबवत होते.
शोध सुरू असताना गोळीबार करत दहशतवादी घनदाट जंगलात पळून गेले. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाला. यामध्ये पाच जवान गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहीद झालेल्या राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांमध्ये कॅप्टन ब्रिजेश थापा हे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगचे होते आणि कॉन्स्टेबल ब्रिजेंद्र आणि कॉन्स्टेबल अजय हे राजस्थानमधील झुंझुनूचे होते. नायक डी राजेश यांची माहिती समोर आलेली नाही.