ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महापालिकेचा थकीत मिळकत कर ऑनलाइन भरल्यास 6 टक्के सूट, पालिका आयुक्तांची ऑफर

सोलापूर,दि.२० : सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2021 – 22 यावर्षी मिळकतीकरा साठी महापालिकेमध्ये आत्तापर्यंत 47 कोटी 59 लाख इतकी रक्कम जमा झाली असून मिळकत कर भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

31 ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांनी आपले मिळकत कर ऑनलाईन भरल्यास 6 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर महापालिका येथे भरल्यास 5 टक्के सूट देण्यात येणार आहे. अशी माहिती आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.

ही योजना 31 ऑगस्टपर्यंत लागू असेल तसेच शहरातील सर्व सर्व मिळकतकराना बिले वाटप करण्यात आले.असून तसेच ओपन स्पेसचे सुद्धा बिले देण्यात आले आहे. सर्व नागरिकांना आवाहन आहे की ज्यांना टॅक्स पावती मिळाले नाही त्यांनी महापालिकेच्या वेबसाइटवर जाऊन बिल घ्यावे येत्या 31 ऑगस्टपर्यंत सूट देण्यात आली असून यापुढे सूट देण्यात येणार नाही. याची नागरिकांनी नोंद घ्यावी ज्या नागरिकांनी रेन हार्वेस्टिंग करून बोर मध्ये पाणी सोडले आहे. अशांना 2 टक्के तर ज्यांनी रेन हार्वेस्टिंगचे पाणी संक मध्ये सोडले आहे. त्यांना 3 टक्के सूट देण्यात आले आहे. तसेच सोलार सिस्टीम ज्यांनी बसवले आहे. त्यांना पाच टक्के सूट जाहीर करण्यात आले होते.

तसेच आत्तापर्यंत रेन हार्वेस्टिंगसाठी 334 मिळकत करांनी अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जामध्ये 231 अर्ज हे अपूर्ण व अर्धवट माहिती असल्याने त्याची माहिती घेता आली नाही. तसेच ज्यांची माहिती अर्धवट आहे त्यांना संपूर्ण माहिती भरण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. तसेच 43 अर्ज हे माहिती घेणे सुरू आहे. आणि 53 हे अर्ज पूर्ण झाले असून त्यांना सूट पण देण्यात आले आहे. शहरात दोन लाख मिळकतकर धारक असून सर्वांनी रेन हार्वेस्टिंग करावे जर केले असल्यास त्यांनी महापालिकेला ऑनलाईन अर्ज भरावे जेणेकरून त्यांना मिळकत करांमध्ये सूट मिळेल.

तरी सोलापूर शहरातील नागरिकांनी मिळकतकर लवकरात लवकर भरावे असे आवाहन आयुक्त पी.शिवशंकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!