---Advertisement---

सिंदखेड राजा- मेहकर मार्गावर तडेगाव फाट्याजवळ डंपर उलटून अपघात; १३ मजूर ठार, मृतांची संख्न्या वाढण्याची शक्यता

Follow Us:
---Advertisement---

बुलढाणा : सिंदखेड राजा- मेहकर मार्गावर तडेगाव फाट्याजवळ डंपर उलटून झालेल्या अपघातात १३ मजूर ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लोखंडी सळईंनी भरलेला हा डंपर रस्त्यावर पलटी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगीतले जात आहे. या अपघातात १२ कामगार जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींपैकी ५ मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमी मजुरांवर किणगाव राजा, सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून काही गंभीर जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात घडला. दुसरबीड येथून लोखंडी गज घेऊन एक डंपर समुद्धी महामार्गच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या तडेगाव येथील कॅम्पकडे जात होता. यात महामार्गावर काम करणारे मजूरही बसले होते. तडेगाव नजीक अचानक हा डंपर उलटून ८ मजूरांचा जागीच मृत्यु झाला.

अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी या कामगारांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेलं. परंतू यापैकी ३ कामगारांचा रस्त्यात मृत्यू झाला. इतर दोन कामगारांनी हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान आपले प्राण गमावावं लागलं. अपघातात सर्व मृत मजूर हे उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यातले असल्याचं समजतंय. या प्रकरणात मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!