हिंगोली : वृत्तसंस्था
महाप्रसादातील भगर खाल्ल्याने लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील ४६७ जणांना विषबाधा झाली आहे. याशिवाय परभणी, बीड, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही असे प्रकार घडले आहेत. पाच जिल्ह्यात एकूण ६५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या. लातुरमधील देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथे ४४३, तर हिंगोलीतील खुडज (ता. सेनगाव) येथील २४ भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली.
वाघनाळवाडी येथे एकादशीनिमित्त गुरुवारी सायंकाळी भगरीचा प्रसाद देण्यात आला. तो खाल्ल्याने ३१५ जणांना गुरुवारी रात्री त्रास झाला. डॉक्टरांनी गावातच ३०६ जणांवर उपचार केले. खबरवाडी (गुरधाळ) येथेही ९३ जणांवर प्रथमोपचार करण्यात आले. कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथील दीडशे भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली होती. पुन्हा गुरुवारी खुडज (ता. सेनगाव) येथील २४ भाविकांना भगरमधून विषबाधा झाली