ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रवीण राऊतांची ७३ कोटीची मालमत्ता ईडीने केली जप्त

मुंबई : वृत्तसंस्था

गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाखांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) बुधवारी जप्त केली. यात प्रवीण राऊत व त्यांच्या निकटवर्तीयांच्या पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील काही भूखंडांचा समावेश आहे.

पत्राचाळ भूखंड आणि त्यावरील एफएसआय विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी ९५ कोटी प्रवीण राऊत यांना मिळाले असून, त्यांनी हे पैसे कुटुंबीय, मित्र व काही व्यावसायिकांच्या खात्यात फिरविल्याचा ठपका ईडीने ठेवला. यातील काही रक्कम वैयक्तिक खात्यात वळवून याच पैशांतून ठाणे, रायगड, पालघर व दापोली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी केल्याचे दिसून आले. मे. प्रथमेश डेव्हलपर्स या राऊत यांच्या कंपनीने हा भूखंड खरेदी व्यवहार करून ही जमीन बक्षीसपत्राद्वारे निकटवर्तीयांच्या नावे केल्याचेही दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!