सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरात गांजा या अमली पदार्थाच्या अवैध विक्री प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अल्फाज शेख यांनी अजित सुखदेव जगताप (रा. स्वराज विहार, सोलापूर) यास ताब्यात घेतले. तो सध्या राहत असलेल्या ठिकाणाहून तसेच सोहाळे (ता. मोहोळ) येथील घरातून गांजा विक्रीचा धंदा करीत असल्याचे आढळून आले.
सविस्तर वृत्त असे कि, पो.नि. अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकातील अंमलदारांनी जगताप याच्या दोन्ही घराची झडती घेतली असता, त्याच्या दोन्ही घरांमध्ये १५ लाख ५० हजार ३८० रुपये किमतीचा एकूण ७७ किलो ५२१ किलो ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. व त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. ही कामगिरी पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, अनिल जाधव, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, वसिम शेख, महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे, नीलोफर तांबोळी, सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, मच्छिद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी केली.