---Advertisement---

अजित पवारांची साथ सोडणारा पहिले नेते ठरतील ; रोहित पवार

By team
On: March 28, 2024 10:21 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुक सुरु असतांना शरद पवार गटाचा मुरूडमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आ.रोहित पवार म्हणाले कि, सुनील तटकरे आज जरी अजित पवार यांच्या सोबत असले, तरी जेव्हा भाजपमध्ये जायची वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ सोडणारे पहिले नेते सुनील तटकरेच असतील अशी घणाघाती टिका त्यांनी केली. यावेळी ते बोलत होते. रोहित पवार यांचे मोठे शक्तिप्रदर्शन यावेळी पाहायला मिळाले. यावेळी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडीत पाटील, माजी आमदार अनिल तटकरे, आस्वाद पाटील, चित्रलेखा पाटील, प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्याला संबोधीत करतांना आमदार रोहीत पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर सडकून टिका केली. ” राजकारणाच्या सुरूवातीला सुनील तटकरे आधी बॅरीस्टर अंतुले यांच्या सोबत होते. त्यांची साथ सोडली. शरद पवारांसोबत होते त्यांची साथ सोडली. शेकापच्या जयंत पाटील यांच्या सोबत होते. त्यांची साथ सोडली. त्यामुळे वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ सोडणारे सुनील तटकरे हे पहिले व्यक्ती असतील” असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला.

तसेच दिल्लीची ताकद किती जरी मोठी असली तरी महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ”केंद्रात आणि राज्यात ज्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार होते. तेव्हा सुप्रिया सुळे खासदार होत्या, पण आपल्या मुलीला डावलून शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रीपदे दिली. काही लोकांना राज्यात तर काही लोकांना केंद्रात देखील मंत्रीपद दिले. आज हे नेते त्यांना सोडून गेलेत आणि आम्हाला पवार साहेबांनी काय दिले असा प्रश्न उपस्थित करत फिरत आहेत”, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!