कुरनूरच्या मोरे प्रतिष्ठानने दिले कोव्हिडं सेंटरला १० फायर सिलेंडर, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न
अक्कलकोट, दि.३० : लोकनेते स्व.ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान कुरनूर यांच्यावतीने अक्कलकोट येथील कोविड डेडिकेटेड हेल्थ सेंटरला दहा फायर सिलेंडर देण्यात आले.शुक्रवारी ,अक्कलकोट येथील तहसील कार्यालयात प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी तहसीलदार अंजली मरोड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
याचा उपयोग कोविड सेंटरच्या सुरक्षेसाठी होईल,असे मरोड यांनी सांगितले.यानंतर
कोविड रुग्णालयात रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची मोरे यांनी विचारपूस
केली. यावेळी तहसीलदार अंजली मरोड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, राष्ट्रवादीचे नेते दिलीप सिद्धे,आरपीआयचे अध्यक्ष अविनाश मडिखांबे, सुरेश सूर्यवंशी बाबा निंबाळकर, शिवराज स्वामी,राम दगडे, बालाजी बिराजदार, औदुंबर डिग्गे, रफिक मुल्ला, विशाल मोरे आदी उपस्थित होते.
कोविड काळामध्ये कै.ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान च्या वतीने आतापर्यंत ५२ पिशव्या रक्तदान व २५ क्विंटल धान्य गरिबांना वाटप करण्यात आले आहे.सदैव गोरगरीब जनतेला प्रतिष्ठानच्या माध्यमातून
मदत केली जात आहे आज १० फायर सिलेंडर देण्यात आले आहेत,असे मोरे
यांनी यावेळी बोलताना सांगितले.