---Advertisement---

अक्कलकोट शहरासाठी स्वतंत्र १०० ऑक्सिजन बेडची सोय करा, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते बळोरगी यांची मागणी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.३० : कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरात देखील नगरपालिकेच्यावतीने स्वतंत्र उपाययोजना होणे आवश्यक असून किमान शंभर ऑक्सीजन बेडची व्यवस्था पालिकेकडून करण्याची मागणी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी यांनी नगराध्यक्ष शोभा खेडगी यांच्याकडे केली आहे.

याबाबत उपनगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनाही चर्चा केली असून तातडीची विशेष सभा बोलून हा विषय मंजूर करून तात्काळ या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे. अक्कलकोट शहर व तालुक्यात सध्या कोरोना रोगाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. सध्या शहरात स्वामी समर्थ रुग्णालय येथे वाढीव रुग्णांना सुविधा पुरवण्यात अडचणी येत आहेत. सध्या ऑक्सिजन बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे आलेल्या पेशंटला जमिनीवर झोपवून उपचार करावा लागत आहे.आता शहरात कोव्हिडं प्रचंड प्रमाणात पसरलेला आहे.

मागील आठ दिवसांपासून सोलापूर शहरात सुद्धा ऑक्सिजन मिळत नाहीत. त्यामुळे नगर परिषदेकडे असलेल्या प्रियादर्शिनी मंगल कार्यालय, साईट नंबर ४० येथे शॉपिंग सेंटरमध्ये किंवा वरिष्ठ प्राथमिक शाळा यात तीन ठिकाणी आपण ऑक्सिजन बेडची व्यवस्था करू शकतो.आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपल्या रुग्णांची सोयकरणे अत्यंत आवश्यक असून ती आपली जबाबदारी आहे. आज रुग्णांचा जीव वाचवणे हीच आपलीच जबाबदारी आहे, असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

सध्या नगरपरिषदेकडे १४ व्या वित्त आयोगाचा आणि १५ व्या वित्त आयोगाचा निधी शिल्लक आहे.सदर निधीमधून ऑक्सीजन बेडची व्यवस्था करू शकतो. तरी नगरपरिषदेने विशेष सभा बोलून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठवावा आणि त्याला मंजुरी द्यावी,अशा प्रकारची मागणी आपण केली असल्याचे बळोरगी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!