ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना संकटात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गरिबांना मिळाली मदत, तडवळ ग्रामस्थांचा आदर्श, ८५ कुटुंबाना मिळाला लाभ

मारुती बावडे

अक्कलकोट : कोरोनाचे संकट आणि वारंवार लॉकडाऊन यामुळे गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत हे ओळखून तडवळ येथे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करून ८५ गरीब कुटुंबांना मदत करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला आहे.

वीरभद्र ग्वाडयाळ, सिद्धाराम बुळळा व बसवराज याबाजी या तिघांनी मिळून या कोरांना महामारीच्या काळात आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या गरीब लोकांना मदत मिळावी यासाठी मूळचे तडवळचे पण सध्या नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या लोकांना व्हाट्सअप ग्रुप तयार करून मदतीसाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास २० ते २५ जणांनी मदत करत एका आठवड्यात जवळपास ५१ हजार ५१२ रुपये जमा केले. देणगी स्वरूपात देऊ केलेल्या रकमेचे तडवळ गावातील सरपंच व इतर लोकांच्या मदतीने ८५ कुटुंबांना प्रत्येकी जवळपास ६०० रुपयेचा किराणामाल व एक शंभर एम एल सॅनिटायझर व तसेच एक मास्क असे बॉक्स तयार करून वितरीत करण्यात आले.

या कामासाठी रमा उपलप, इरफान सुभेदार, बसवराज याबाजी, सिद्धाराम बुळळा, शिवानंद तदेवाडी, मलप्पा बिराजदार, गजानन निंर्गीकर, संतोष ब्यागेहळळी, शिवानंद पनशेट्टी, प्रशांत बिराजदार, संतोष माळी ,सचिन बिराजदार, सोमय्या हिरेमठ, वीरभद्र ग्वाडयाळ, बाबुशा माळी ,शिवाजी पाटील, संतोष कुंभार, अण्णाप्पा निंबर्गीकर, अनंत चौधरी, प्रीति चव्हाण, ईश्वर कोळी, सिद्धार्थ गायकवाड, सिद्धू याबाजी ,बालाजी कुंभार, रेणू कुंभार यासह अनेकांनी या सामाजिक कार्याला आर्थिक मदत केली.

यासाठी सरपंच संतोष कुंभार उपसरपंच भीमाशंकर ग्वाडयाळ ,सिद्धार्थ गायकवाड, श्रीशैल माळी, मलकणणा याबाजी ,संजू मामा याबाजी ,सुबानी शेख, संतोष रत्नाकर, पिंटू दिंडोरे, राघवेंद्र याबाजी, रत्नाकर सुरेश ,कल्लप्पा माळी मोठे सहकार्य
लाभले. किराणा मालासाठी शिवानंद तदेवाडी यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सरपंच संतोष कुंभार यांनी सर्व दानशूर व्यक्तींचे व हे मदत कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!