---Advertisement---

जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘ या ‘ आदेशामुळे महिला वर्गाला मिळाला दिलासा

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एक नवा आदेश काढला आहे. यामुळे महिला वर्गाला दिलासा मिळाला आहे. या आदेशांमध्ये आता यापुढे अत्यावश्यक उपचार हवे असणाऱ्या रुग्णांना तसेच गरोदर स्त्रियांच्या प्रसूती वेळी कोविड टेस्ट बाबतची सक्ती होती ती करू नये, असे म्हटले आहे.

यासंबंधी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सर्व कोविड सेंटर, हॉस्पिटल आणि आरोग्य यंत्रणा यांनी करावे, असे म्हटले आहे. याबाबत महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व प्रांत अधिकारी, आरोग्य अधिकारी महापालिका, सर्व तहसीलदार व सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना कळवण्यात आले आहे. याबाबत अनेकांनी पाठपुरावा केला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!