अक्कलकोट, दि.२७ : उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांची धडाकेबाज कारवाई; तालुक्यातील एका गावातील शुक्रवारी पहाटे 5.30 दरम्यान होणारा अल्पवयीन विवाह सोहळा रोखण्यात यश आले.
पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी उत्तर पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून ठाण्यातील अंतर कार्यपध्दतीत बदला बरोबरच कोरोना काळात पूर्वलक्षी कारवाईला महत्त्व दिल्याने पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोवीडला हद्दपार करण्यासाठी नियोजनबद्द कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील वागदरी भागातील एका गावात बालविवाह शुक्रवारी होणार असल्याची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या पथकातील अंगद गिते, राम चौधरी, बिपीन सुर्यवंशी यांनी कारवाई केलेली आहे.
याकामी बाल हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष व एकात्मिक बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी बालाजी अक्कलवाडे व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई झाली असून घडलेल्या घटनेबाबत खळबळ उडालेली आहे.
★ हातभट्टीवरही कारवाई
अक्कलकोट शहरात 900 लिटर रसायन व 50 लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली असून सदरची कारवाई पो.नि.गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाने कारवाई केलेली आहे.