---Advertisement---

राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढणार; नवीन नियमावली १ जूनला जाहीर होणार

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय होणार आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर गो स्लो गेलं पाहिजे. त्यामुळेच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे. तसेच गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितलं.

म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत रुग्णांनी उपचार घ्यावेत. एकूण 131 रुग्णालयांमध्ये या आजारावर मोफत उपचार करण्यात येत आहेत, असे ते म्हणाले. तसेच म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये ते वेळेवर मिळत नाहीत. या इंजेक्शनचं नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
लसीकरणाला लागणारा निधी आम्ही तयार करून ठेवला आहे. एका चेकने सर्व रक्कम द्यायला आम्ही तयार आहोत. हे आम्ही वारंवार सांगतोय. आता फक्त केंद्राने लस द्यायला हवी, असं त्यांनी सांगितलं. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत देशात अजून कोणतंही धोरण ठरलेलं नाही. मात्र, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं सांगितलं जातंय. आम्ही त्याची सगळी तयारी करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!