ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटच्या नवीन बसस्थानकाला मुहूर्त कधी ?निधी मंजूर होऊनही कामाचा पत्ता नाही

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१२ : तीर्थक्षेत्र
अक्कलकोट शहरातील बसस्थानकाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून इमारतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही कामाला सुरुवात नसल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.त्यामुळे आता नेमके सुसज्ज इमारतीचे स्वप्न पूर्ण होणार तरी कधी होणार? असा सवाल विचारला जात आहे.

पावसाळ्याचे दिवस आल्याने परिसराची अवस्था अतिशय बिकट बनते. हे बस स्थानक खूप जुने आहे.ठीक – ठिकाणी गळती पण आहे. इमारत जुनी असल्याने प्रवाशांसह भाविकांची अडचण होते.भाजप सरकारने या कामासाठी ५ कोटी ९० लाख रुपये मंजूर केले होते. पण पुढे काहीच झाले नाही.त्यामुळे स्मार्ट बसस्थानकाची उभारणी कधी होणार असा सवाल विचारला जात आहे.

याबाबत योग्य तो पाठपुरावा झाल्यास हे काम गतीने पूर्ण होईल.पण त्याचा पाठपुरावा होताना पाहायला मिळत नाही.अक्कलकोट हे शहर सुमारे
पन्नास हजार लोकसंख्येचे शहर आहे.
मुख्य म्हणजे हे तालुक्याचे ठिकाण आहे.त्यामुळे याठिकाणी सुसज्ज बसस्थानकाची नितांत गरज आहे.भाजप सरकार असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून राज्यात बसस्थानके अत्याधुनिक करण्याच्या १०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट बस स्थानकाचा देखील समावेश होता.
पण पुढे हे काम अजूनही प्रलंबित आहे.

आज तुळजापूर,पंढरपूर, इंदापूर ह्या तालुक्याच्या ठिकाणी स्मार्ट बसस्थानके झाली.पण अक्कलकोटमध्ये वर्षानुवर्षापासून तीच स्थिती आहे.
त्यामुळे नाराजीचा सुरू उमटत
आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!