---Advertisement---

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर “या” मुद्द्यावरून साधला निशाणा

Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर : जीएसटी रकमेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि अशी झाल्याची टीका अजित पवार यांनी कोल्हापुरात केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. चंद्रकांत दादांना जीएसटीचे खरी आकडेवारी माहित नाही. दुर्दैवाने ते मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे त्यांना आकडेवारीची वस्तुस्थिती माहित नाही.

केंद्राकडून महाराष्ट्राला जीएसटीचे 24 हजार कोटी येणे बाकी आहे. आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे आमच्याकडे ऑफिशियली आकडे आहेत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहिच मागण्यांचा पत्र त्यांना दिला आहे. त्यात ही आकडे दिला आहे. काही लोकांना काही माहीत नसतं काही बोलायचं सवय असते. आपल्याकडे “विनाशकाले विपरीत बुद्धि” अशी एक म्हण आहे. काही लोकांची अवस्था अशी झाली आहे. असा टोला पवार यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना लगावला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!