---Advertisement---

इंजन बदलण्याची गरज काँग्रेसला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाना पटोले यांना प्रत्युत्तर

Follow Us:
---Advertisement---

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी टीका केली होती. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात “पुण्यदशम… फक्त दहा रुपयात दिवसभर एसी बसचा प्रवास” या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बारा आमदारांच्या निलंबनावर कडाडून टीका केली. लोकशाहीला फासावर चढवण्याचा काम राज्यातील महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, डबे बदलून उपयोग नाही, तर इंजिन बदलायला हवी हा वक्तव्य काँगेस बद्दल होते काय? असा प्रतिसवाल करत ‘इंजिनचा प्रॉब्लेम हा काँग्रेस पक्षाला’ आहे. तो केंद्रात आणि राज्यातही आहे असे फडणवीस म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!