---Advertisement---

‘काळजी करू नका, सर्व मदत केली जाईल’, मुख्यमंत्र्यांकडून तळिये गावातील लोकांना आश्वासन

Follow Us:
---Advertisement---

रायगड / महाड: तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.

मुख्यमंत्री आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तळिये गावात पोहोचले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्यसचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी  निधी चौधरी आदी उपस्थित होते.

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 40 लोक ठार झाले आहेत. दरडीखाली अख्खं गावच गाडलं गेलं आहे. त्यामुळे संपूर्ण गावावर आता शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत झाले. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना झाले. तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!